पौड:-शिवसेना
पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांचे आदेशावरून ,शिवसेना नेते ,पुणे जिल्हा
संपर्कनेते मा.गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि
मुळशी पंचायत समितीचे माजी गटनेते दत्तात्रय नारायण सुर्वे यांची "शिवसेना
जिल्हा समन्वयक पदी " निवड केली असून त्यांचेकडे भोर आणि पुरंधर विधानसभा
मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दत्तात्रय सुर्वे हे मुळशी तालुक्यातील शिवसेना स्थापनेतील एक प्रमुख असून त्यांनी आजवर शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख,जिल्हा सचिव,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,मुळशी तालुकाप्रमुख,शिवसेना मुळशी पंचायत समिती पक्ष प्रतोद,गटनेते ,भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख,जिल्हा उप प्रमुख,आशी पक्षाची विविध पदे भूषविली असून २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत ते आंबवणे गणातून निवडून आले होते,जिल्ह्यातील एक अभ्यासू पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांचा लौकिक झाला होता.त्यांनी पंचायत समिती कार्यकालात अनेक महत्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत.
मुळशी तालुक्यातील अनेक निवडणुकात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे.सुर्वे यांची "शिवसेना जिल्हा समन्वयक पदी " निवड झालेबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख ,माजी आम.शरद ढमाले ,लोकप्रिय आमदार विजयबापू शिवतरे ,तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,सुनील जागडे,गणेश बागल,श्री .यादव ,महिला आघाडी जिल्हा संघटक शोभाताई पासलकर आदींनी त्यांचे आभिनदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या आहेत.