पुणे :- दिवाळी अंकांनी वाचन संस्कृती सांभाळून या स्पर्धेच्या काळात नाव नवीन विषयांना हाताळण्याची गरज आहे,नवीन पिढीला चालना देतील असे विषय घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध केल्यास वाचन चळवळीला वेग येईल असा विश्वास महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि पत्रकार श्री .एस.एम.देशमुख यांनी केले.
दत्तात्रय सुर्वे संपादित मासिक शिवमार्ग च्या सातव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री .एस.एम.देशमुख यांचे हस्ते पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या पुणे येथील कार्यालयात नुकतेच करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.या दिवाळी अंक प्रकाशन समारंभास पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री .शरद पाबळे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज ,पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे,८७व्य आखिल भारतीय साहित्य संमेलन सासवड चे प्रसिद्धी प्रमुख,शिवश्री दशरथ यादव ,पत्रकार दत्तात्रय जोरकर ,शिवमार्ग च्या कु.स्नेहल सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते.
मासिक शिवमार्ग चा दिवाळी अंक -२०१३ हा "हिंदुराष्ट्र विशेषांक" म्हणून प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये हिंदू जन जागृती समितीच्या सहकार्याने अनेक विचारमंथन करणारे लेखन करण्यात आले आहे..त्यामध्ये हिंदुराष्ट्र हे स्वप्न नसून...आस्तित्व हिंदू धर्माचे ,..हिंदुत्व,,हिदुधर्म,आणि सावरकर..भारत हि हिंदूंची भूमी ,हिंदुराष्ट्र का हवे? धार्मिक समस्यांच्या दृस्तीकोनातून..आदी हिंदुराष्ट्र विषयी खास लेखन करण्यात आले आहे.प्रत्येकाने हा अंक वाचवा..विचार करावा आणि आपला धर्म पळत इतरांच्या धर्माचा आदर करावा ..असा संदेश हा अंक वाचकांना देतो..
शिवमार्ग दिवाळी अंकात कथा,लेख,विनोद,व्यंगचित्रे ,वात्रटिका आशा साहित्याबरोबरच नलिनी भोसेकर यांची " ती वीस वर्षे "" हि मनोवेधक आणि रंजक लघु कादंबरी प्रसिद्ध करण्यात आली आहे./ए दिवाळी अंकात अनेक मान्यवर लेखकांबरोबरच नूतन लेखकांना स्थान देण्यात आलेले आहे.आकर्षक मुख पृष्ठ सह सुमारे २१० पानांचा भर असलेल्या या अंकाचे आकर्षण वाचकांना नक्कीच राहील असा विश्वास संपादक श्री .दत्तात्रय सुर्वे यांनी व्यक्त केला आहे.या अंकाचे मुल्य फक्त रु.७५ आहे.हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment